बंद करा

औद्योगिक

हातमाग व यंत्रमाग उद्योग

सोलापूर हे हातमाग व यंत्रमाग विणकाम उद्योगाचे माहेरघर आहे. हे उद्योग मोठ्या प्रमाणात लोकांना रोजगार पुरविते. जिल्ह्यात जवळपास ६००० यंत्रमाग उद्योग घटक कार्यरत आहेत. त्यापैकी जवळपास ३०० यंत्रमाग उद्योग घटक हे मुंबई दुकाने व  संस्था कायदा १९४८ अंतर्गत व ईतर ३००० यंत्रमाग उद्योग घटक कारखाने कायदा १९४८ अंतर्गत नोंदणी झालेले आहेत. जिल्ह्यात जवळपास २५००० यंत्रमाग घटक आहेत व त्यावर जवळपास ३०००० कामगार काम करतात. जेकार्ड यंत्रमागावर चादर, टॉवेल व हातरुमालाचे उत्पादन केले जाते. उच्चतम गुणवत्तेमुळे ह्या उत्पादनाचे विदेशात निर्यात केले जाते. कामगारांचे हित व कल्याण पाहण्यासाठी खालील कामगार संघटना कार्यरत आहेत व प्रत्येक कामगार हा खालीलपैकी कुठल्या तरी संघटनेचा सदस्य आहे.

  1. लाल बावटा श्रमिक कामगार संघटना (सीटू)
  2. यंत्रमाग कामगार संघटना (आयटक)
  3. राष्ट्रीय यंत्रमाग कामगार संघटना (ईंटक)
  4. बीडी व यंत्रमाग कामगार सेना (शिवसेना)

यंत्रमाग उद्योगाचे हित पाहण्यासाठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग संस्था ही स्वतंत्र संस्था यंत्रमाग मालकासाठी कार्यरत आहे. प्रामूख्याने सर्व यंत्रमाग उद्योग घटक हे सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत कार्यरत असतात व दुपारी २ तासाची जेवणाची विश्रांती आहे. काही यंत्रमाग उद्योग घटक हे सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत व दुपारी ४ ते रात्री १२ पर्यंत दोन पाळीत चालू आहेत.

 हातमाग व यंत्रमागावर हे कामगार जेकार्ड चादर, टॉवेल व हातरुमाल यांचे उत्पादन करतात. कामगारांना पगार उत्पादनच्या प्रकारानुसार पीस रेट ह्या तत्वानुसार दिले जाते. पीस रेट हे वेगवेगळ्या उत्पादन साठी वेगवेगळे असल्याने कामगारांच्या उत्पन्नात फरक जाणवतो. सामान्यता पीस रेट नुसार एका कामगाराला सरासरी दिवसाला ७० ते ९० रुपये वेतन मिळते.

बीडी उद्योग

बीडी उद्योग हे चादर उद्योगानंतर दुसरे मोठे उद्योग आहे. जिल्ह्यात एकूण २९ बीडी उद्योग समूहाचे ११५ उत्पादन घटक आहेत. ह्या ११५ घटकात एकूण ७०००० महिला कामगार व १७२५ कारखाना कामगार आहेत. कामगारांच्या हितासाठी ४ बीडी कामगार संघटना कार्यरत आहेत.

  1. राष्ट्रीय बीडी मजदूर संघ (ईंटक)
  2. लाल बावटा बीडी कामगार संघटना (सीटू)
  3. सोलापूर बीडी कामगार संघटना (आयटक)
  4. बीडी व यंत्रमाग कामगार सेना (शिवसेना)

वरीलपैकी राष्ट्रीय बीडी मजदूर संघ (ईंटक) हि संघटना महाराष्ट्र कामगार संघटना रीकग्नायझेशन व प्रोहिबिशन ऑफ ईल्लीगल वर्कर्स ट्त्राडीषन अँक्ट १९७१ कायद्य़ा अंतर्गत मान्यता प्राप्त आहे व सहा बीडी कारखान्यात कार्यात आहे.

सुधारित न्यूनतम वेतन

बीडी कामगारासाठी महाराष्ट्र शासनाने १८.०३.२००० पासून सुधारित न्यूनतम वेतनाची घोषणा केलेली आहे. ०१-०७-२००० ते  ३१-१२-२००० ह्या कालावधी साठी सध्याचे सुधारित न्यूनतम वेतन १०० बीडी वळण्यासाठी रुपये ३९ व विशेष भत्ता रुपये ११ असे आहे.  पण बीडी मालक व बीडी कामगार संघटना ह्यांच्यातील करारा नुसार १०० बीडी वळण्यासाठी रुपये ३३ व विशेष भत्ता रुपये ६.७८ असे आहे.बीडी कामगारांना मिळत असलेले वेतन हे शासनाच्या न्यूनतम वेतन कायद्यानुसार कमी आहे.