बंद करा

वन्यजीव

वेगाने होत असलेल्या शहरीकरणामुळे व लोकसंख्या वाढीमुळे प्राण्यासाठी असणारी वन्य जमिनीचे क्षेत्र कमी कमी होत चालले आहे व प्राण्यांना स्वताचे अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे व काही प्राण्याचा प्रजाती नामशेष होण्याचा मार्गावर आहेत. ह्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देवून नामशेष होवू घातलेल्या प्राणी व पक्षी यांच्या संरक्षणासाठी व संवर्धनासाठी सरकारतर्फे प्राणी व पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली गेली आहेत.

माळढोक पक्षी हा असाच एक नामशेष होण्याच्या मार्गावर असलेला दुर्मिळ पक्षी आहे. हा पक्षी गुजरात, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटका, आंध्र प्रदेश व मध्य प्रदेश ह्या राज्यातील काही भागात आढळतो. संबधित राज्य सरकारांनी माळढोक पक्ष्यासाठी अभयारण्ये घोषित केली आहेत. ह्या दुर्मिळ व नामशेष होण्याचा मार्गावर असलेल्या माळढोक पक्ष्याचा संरक्षणासाठी व संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने १९७९ मध्य माळढोक अभयारण्याची घोषणा केली. ह्या अभयारण्यात सोलापूर जिल्ह्याचा उत्तर सोलापूर, माढा , मोहोळ आणि करमाळा तालुकाचे काही क्षेत्र व अहमदनगर जिल्ह्याचे कर्जत, श्रीगोंदा व नेवासा तालुकाच्ये काही क्षेत्र असे एकूण ८४९६.४४ चौ. कि मी क्षेत्र समाविस्थ आहे. माळढोक पक्ष्याचा समावेश वन्यजीव कायदा १९७२ च्या शेडूल – १ मध्ये समाविस्थ केले आहे व आवश्यक ते संरक्षण दिलेले आहे. अभयारण्याचे मुख्यालय सोलापूर जिल्ह्यासाठी नान्नज येथे व अहमदनगर जिल्ह्यासाठी रेहेकुरी येथे आहे.

अभयारण्याची ईतर ठळक वैशिष्ठे

  • क्षेत्र – माढा मोहोळ करमाळा व उत्तर सोलापूर तालुका (सोलापूर जिल्हा) व कर्जत श्रीगोंदा व नेवासा तालुका (अहमदनगर जिल्हा) अभयारण्य – माळढोक अभयारण्य
  • मुख्यालय – नान्नज (सोलापूर जिल्हा) व रेहेकुरी (अहमदनगर जिल्हा)
  • भौगोलिक क्षेत्र – ८४९६.४४ चौ. कि. मी.
  • अभयारण्य प्रकाशन नं. W.LP/1078/72634/F.A dtd.,27.09.1979 2.W.LP/1085/CR-588/F-5 dtd.19.09.1985
  • तापमान – नुन्यतम १६ डिग्री सेल्सीयस व अधिकतम ४३ डिग्री सेल्सीयस
  • सरासरी पर्जन्यमान – ४५० ते ६०० मि मी
  • कसे पोहोचाल – नान्नज – सोलापूर-बार्शी रोडवर सोलापूर पासून २२ कि मी अंतरावर आहे. रेहेकुरी – कर्जत-वालवड रोडवर कर्जतपासून ८ कि मी अंतरावर आहे.
  • जंगल प्रकार – दक्षिण प्रादेशिक काटेरी जंगल
  • आढळणारे मुख्य प्राणी व पक्षी – माळढोक, काळवीट, लांडगा, कोल्हा
  • वास्तव्य – सोलापूर, नान्नज, करमाळा, माढा, रेहेकुरी, कर्जत, श्रीगोंदा व नेवासा येथील वन विभागाची विश्राम गृहे
  • भेट देण्यास योग्य काळ – जुलै ते डिसेंबर