सोलापूर जिल्हा विशेषत: धार्मिक पर्यटनासाठी प्रसिध्द आहे. जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट, करमाळा आणी बार्शी ही महत्वाची स्थळे आहेत.
रस्ते व रेल्वे या मार्गाने जिल्हा इतर मोठ्या शहरांस जोडला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ तुळजापूर हे सोलापूर पासुन 40 कि.मी. अंतरावर आहे.
कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध ऐतिहासीक शहर विजयपूर हे सोलापूर पासुन 100 कि.मी. अंतरावर आहे.
सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते गोवा विमान सेवा सोलापूर येथून सुरू झाली आहे.