बंद करा

सोलापूर

सोलापूर – श्री सिध्देश्वर हे सोलापूर शहराचे ग्राम दैवत आहे. श्री सिध्देश्वर मंदिर शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. मंदिराच्या तीन बाजूस तलाव असून एकाद्या बेटासारखे मंदिराचे दृश्य दिसते. श्री सिद्धेश्वारांचा थोडक्यात इतिहास पुढीलप्रमाणे आहे. १२ व्या शतकात सोलापूर शहरात श्री सिध्दाराम नावाचे थोर संत होऊन गेले. त्यांनी श्री बसवेश्वर यांच्या शिकवणूक व उपदेशाचा प्रसार केला. श्री सिध्दाराम यांच्या शिकवणुकीने व उपदेशानी प्रेरित होऊन एका तरुण कुंभार कन्येने त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली पण श्री सिध्दाराम हे ब्रम्हचारी असल्याने त्यांनी या लग्नास नकार दिला व त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले. हाच प्रतीकात्मक विवाह सोहळा दर वर्षी सिध्देश्वर यात्रा म्हणून मकर संक्रांति च्या काळात भोगी, संक्रांति व किंक्रांती ह्या तीन दिवसात साजरा केला जातो. नंदी ध्वज हे विवाहासाठी प्रतीकात्मक वर व वधू मानले जातात. दर वर्षी साधारणपणे १४ जानेवारीच्या आसपास हा सोहळा पार पडतो. ह्याच काळात १५ दिवसासाठी सिध्देश्वर जत्रेचे आयोजन केले जाते. सिध्देश्वर यात्रेला स्थानिकरीत्या गड्डा जत्रा असेही संबोधले जाते.

  • श्री सिध्देश्वर सोलापूर
  • श्री सिध्देश्वर यात्रा सोलापूर
  • श्री सिध्देश्वर यात्रा सोलापूर
  • श्री सिध्देश्वर मुर्ती
  • नंदीध्वज दृश्य - श्री. सिद्धेश्वर यात्रा
  • श्री सिध्देश्वर यात्रा हवाई दृश्य

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ मुंबई, हैद्राबाद, औरंगाबाद. अत्यंत जवळचे विमानतळ - पुणे.

रेल्वेने

मध्य रेल्वेच्या पुणे- हैद्राबाद, पुणे- चैनई मार्गावर आहे.

रस्त्याने

मुंबईपासुन 410 कि.मी. पुण्यापासुन 250 कि.मी. हैद्राबाद पासुन 305 कि.मी.