आयआरएडी-इंटीग्रेटेड रोड अक्सिडेंट डेटा बेस
प्रारंभ : 01/01/2021 शेवट : 31/12/2025
ठिकाण : सोलापूर
आयआरएडी (आयर्याड) हा भारत सरकार, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालय, द्वारा सुरू केलेला एक प्रकल्प आहे.
महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा प्रकल्पाच्या पहिल्या (पथदर्शी) टप्प्यात आहे.
पोलिस, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग या विभागा मार्फत हा प्रकल्प राबविला जात आहे
राज्यस्तरावर एडीजी पोलिस (म.शा.), परिवहन आयुक्त (म.शा.), यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हास्तरीय नोडल अधिकारी यांच्या मदतीने, हा प्रकल्प राबविला .जातो.
जिल्ह्यातील स्थानिक कार्यालये, पोलिस आयुक्त कार्यालय (रहदारी), पोलिस अधीक्षक (रहदारी आणि महामार्ग), प्रादेशिक परिवहन कार्यालय (सोलापूर, अकलूज) आहेत.
राज्य स्तरावरील एसआयओ, एनआयसी (रा.सू .वि.कें.) महाराष्ट्र कार्यालयामार्फत अंमलबजावणी व मार्गदर्शन केले जाते.
तांत्रिक सहाय्य सोलापूरच्या एनआयसीच्या (रा.सू .वि.कें.) जिल्हा कार्यालया द्वारे केले जाते.
‘सर्वांसाठी सुरक्षित रस्ता’ हे या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. या प्रकल्पात रस्ते अपघातांचे राष्ट्रीय डेटाबेस अद्यावत असेल.
या डेटाबेस मुळे अधिकार्याना रस्ते रहदारी, अपघात, रस्त्यांची स्थिती इत्यादी बाबींचा अभ्यास करण्यास मदत होईल.
या प्रकल्पा द्वारे विविध धोरणांची अंमलबजावणी करण्यात मदत होईल, रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी निर्णय घेता येईल जेणेकरून अपघात कमी होतील.
अशा प्रकारे सर्वांना सुरक्षित रस्ता मिळेल.
जिल्हास्तरावर हा प्रकल्प एनआयसी चे जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी, अतिरिक्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी आणि रोल आउट मॅनेजर (निकसि) हे
०१/०१/२०११ पासून प्रकल्प राबविण्यास तांत्रिक मदत करीत आहेत.
अधिक माहिती साथी येथे क्लिक करा.
सोलापूर जिल्हयाच्या अद्यावत महितीसाठी येथे क्लिक करा.
पहा (71 KB)