पंढरपूर
पंढरपूर – हे श्री विठ्ठल व श्री रूक्मिणी यांचे पवित्र स्थान आहे. पंढरपूर भारताची दक्षिण काशी व महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणुन पण प्रसिध्द आहे. सोलापूर जिल्हा मुख्यालयापासून ७२ कि.मी. अंतरावर वसले आहे. पंढरपूर रेल्वे स्थानक मिरज-कुर्डूवाडी-लातूर ह्या रेल्वे मार्गावर आहे.
श्री विठ्ठलाच्या प्राचीन मंदिराचे ई स ११९५ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आले. शहरात इतर हिंदू देवतांचे मंदिरे व अनेक संतांचे मठ (धर्मशाळा) आहेत. पंढरपूर शहर चंद्रभागा (भीमा) नदीच्या काठावर वसले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशी व्यतिरिक्त पंढरपुरात १२ महिने नेहमीच महाराष्ट्रातील व लगतच्या राज्यातून असंख्य संख्येने भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गर्दी करतात. आषाढी व कार्तिकी वारीसाठी राज्यातील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या निघून वाखरी येथे जमतात.
विठ्ठल मंदिरात काकडा आरती, महापूजा, महानैविध्य, पोशाख, धुपारती, पाद्यपूजा, शेजारती इत्यादी विविध नित्योपचार केले जातात. मुख्य मंदिरात नामदेव पायरी दरवाजातून प्रदेश करून पश्चिम दरवाजातून मंदिरातून बाहेर पडताना खालील देव देवतांचे दर्शन होते.
- नामदेव पायरी – श्री संत नामदेव यांच्या स्मरणार्थ
- गणेश मंदिर
- दत्त मंदिर
- गरुड मंदिर
- मारुती मंदिर
- चौरंगी देवी मंदिर
- गरुड खांब
- नरसिंह मंदिर
- एक मुख दत्तात्रय मंदिर
- रामेश्वर लिंग मंदिर
- कालभैरव मंदिर
- लक्ष्मी नारायण मंदिर
- काशी विश्वनाथ मंदिर
- सत्यभामा मंदिर
- राधिका मंदिर
- सिद्धिविनायक मंदिर
- महालक्ष्मी मंदिर
- वेन्कटेश्वर मंदिर
- कान्होपात्रा मंदिर
- अंबाबाई मंदिर
- शनी देव मंदिर
- नागनाथ मंदिर
- गुप्तलिंग मंदिर
- खंडोबा मंदिर
श्री विठ्ठल रूक्मिणी च्या मुख्य मंदिराव्यतिरिक्त ईतर प्रमुख मंदिरे
- पद्मावती मंदिर – रेल्वे स्थानक रोड
- लखुबाई / रूक्मिणी मंदिर – चिंच बाग
- अंबाबाई मंदिर – दगडी पूल सोलापूर रोड
- गोपाळपूर – २ कि मी अंतरावर
- विष्णुपाद – २ कि मी अंतरावर
- पुंडलिक मंदिर – चंद्रभागा नदी काठावर
- नामदेव मंदिर – प्रदक्षिणा मार्ग
- ज्ञानेश्वर मंदिर – नाथ चौक
- तुकाराम मंदिर – प्रदक्षिणा मार्ग
- काळा मारुती मंदिर – प्रदक्षिणा मार्ग
- तांबडा मारुती मंदिर – प्रदक्षिणा मार्ग
- व्यास नारायण मंदिर – सोलापूर रोड
- यमाई तुकाई मंदिर – सांगोला रोड
- गजानन महाराज मंदिर – शिवाजी चौक
- ताकपिठ्या विठोबा – मंडी जवळ
- राम बाग – सोलापूर रोड
- लक्ष्मण बाग – रेल्वे स्थानक रोड
पंढरपुरातील ईतर महत्त्वाची ठिकाणे
- संत कैकाडी महाराज मठ – हे शहराच्या उत्तरेस आहे. सर्व देव देवतांचे व संतांचे दर्शन घडवणारे सुंदर असे हे स्थळ आहे. पूर्ण परिसर पाहण्यासाठी कमीत कमी २ तासांचा अवधी लागतो.
- संत तनपुरे महाराज मठ
- गुजराती देवस्थान – भीमा नदीच्या पलीकडे वसलेले आहे. भक्तांना श्रीनाथजी चे दर्शन घेण्यासाठी नदी पार करून जावे लागते.
पंढरपुरातील मुख्य सण व उत्सव
पंढरपुरात बुधवार हा आठवडयाचा पवित्र वार व एकादशी हि तिथी पवित्र तिथी मानली जाते. आषाढी एकादशी वारी, कार्तिकी एकादशी वारी, माघ एकादशी वारी व चैत्र एकादशी वारी हे चार महत्त्वाचे वारी उत्सव आहेत. ह्या चार वारी पैकी आषाढी व कार्तिकी वारीसाठी जवळपास ८ ते १० लाखाचा वारकरी भक्त समुदाय उपस्थित असतो.
ह्या चार वारी व्यतिरिक्त गुडी पाडवा, रामनवमी , दसरा व दिवाळी हे उत्सव पण मोठया भक्ती भावाने साजरा केला जातो. पावसाळा सुरु झाल्यानंतर आषाढ महिन्यात आषाढी एकादशीचा उत्सव असतो. सर्व शेतकरी शेतातील पावसाळ्या पूर्वीचे मशागत व पेरणीचे काम संपवून आषाढी वारीमध्ये सामील होतात. महाराष्ट्रीतील विविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे प्रस्थान करतात. संतांच्या पालख्या पायी प्रवास करून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात व श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेवून माघारी फिरतात. महाराष्ट्राबरोबरच कर्नाटक, गुजरात, राजस्थान, तमिळ नाडू ब आंध्र प्रदेश ह्या राज्यातून पण वारकरी मोढ्या संख्येने वारीमध्ये सामील होतात.
आळंदी हून संत ज्ञानेश्वर व देहू येथून संत तुकाराम महाराजाच्या पालखीसोबत जवळपास २ लाख वारकरी विविध दिंड्यातून पंढरपूरकडे पायी प्रस्थान करतात. ह्या सोबतच महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहुन इतर संतांच्या पालख्या प्रस्थान करतात. जवळपास ७-८ लाख वारकरी आषाढी एकादशी च्या काळात भेट देवून विठ्ठलाचे दर्शन घेतात.
पावसाळा संपल्यानंतर लगेच कार्तिक महिन्यात एकादशीला पंढरपुरात दुसरी मोठी वारी भरते. जवळपास ३-४ लाख वारकरी कार्तिकी एकादशीच्या काळात पंढरपूरला भेट देतात. उन्हाळयाचे सुरुवातीला माघ महिन्यात एकादशीला माघी यात्रा होते. जवळपास २ लाख वारकरी ह्या काळात पंढरपूरला भेट देतात. हिंदू वर्ष्याच्या सुरुवातीला चैत्र महिन्यात एकादशीला चैत्री यात्रा होते. जवळपास १ लाख वारकरी ह्या काळात पंढरपूरला भेट देतात.
मुख्य मंदिर
विठ्ठल मंदिर हे पंढपूर शहराच्या मध्यवर्ती भागात वसलेले आहे. मंदिराला एकूण ८ प्रवेश द्वार आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेश द्वार हे पूर्वेकडील महाद्वार म्हणजे नामदेव नामदेव पायरी हे आहे. नामदेव पायरीखाली प्रसिद्ध संत नामदेव यांचे पार्थिव शरीर त्यांच्या इच्छेप्रमाणे पुरले आहे.
नामदेव पायारीहून मंदिरात प्रवेश केल्यावर ३ लहान कप्प्याचे मुक्ती मंडप लागते. मुक्ती मंडपातून आत गेल्यावर १२०’ x ६० ‘ परिमाणाचे विठ्ठल सभा मंडप लागते. तेथून पुढे गेल्यास आपण सोळखांब मध्ये प्रवेश करतो. १६ खांबाच्या आधारावर हे दगडी मंडप उभारले असल्याने ह्याला सोळखांब असे नाव पडले आहे.
ह्या सोळा खाम्बापैकी एका खांबाला सोने व चांदीच्या पत्र्यांनी मढविलेले आहे व हे खांब गरुड खांब म्हणुन प्रसिद्ध आहे. सोळखांब जवळच एका मोद्ठ्या दगडावर ई स १२०८ असा उल्लेख सापडतो. सोळखांब कडून गाभ्यारात प्रवेश करताना चार खांबावर उभारलेले चौखांब आहे. चौखांबातून आपण गाभ्यारात प्रवेश करतो. मुख्य गाभारा ६ चौरस फुटाचा असून ३ फुट उंचीचा चांदीने मढविलेला कट्टा आहे. ह्या कट्ट्यावर श्री विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठल हा विठोबा, पंढरी, पांडुरंग, विठ्ठल नाथ आदि नावानी पण प्रसिद्ध आहे. मुख गाभ्याऱ्याच्या मागील बाजूस उत्तर पूर्वेला रूक्मिणी मातेचे मंदिर आहे. रूक्मिणी मंदिरात गाभारा, सभा मंडप, हॉल, दर्शनासाठी आत जाण्याची व बाहेर पडणयाची व्यवस्था आहे.
पद स्पर्श दर्शन
पंढपुरात सर्व जाती धर्माच्या भाविकांना गाभ्यारात प्रवेश मिळतो व विठ्ठला चरणी माथा टेकण्याची संधी मिळते. अशी माथा टेकून दर्शन घेण्याची संधी ईतर मंदिरात क्वचितच उपलब्ध आहे. पद स्पर्श दर्शनासाठी साधारण दिवशी २ टे ३ तास, साप्तहिक सुट्टीला व एकादशी दिवशी ४ टे ५ तास व यात्रा काळात ३४ टे ३६ तास लागतात.
ज्या भक्तांना वेळेअभावी पद स्पर्श दर्शन शक्य नाही त्यांना २५ मीतर लांबून विठ्ठलाचे व १५ मीटर लांबून रुक्मिणीचे दर्शन शक्य आहे. मुख दर्शनासाठी १५ टे २० मिनिटाचा कालावाधी लागतो.
कसे पोहोचाल?:
विमानाने
जवळचे विमानतळ - पुणे व कोल्हापूर.
रेल्वेने
मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी-मिरज मार्गावर आहे.
रस्त्याने
सोलापूरपासुनचे अंतर 72 कि.मी.