बंद करा

बार्शी

बार्शीतील भगवंत मंदिर

बार्शी शहर भगवंत मंदिरासाठी प्रसिध्द आहे. भगवंत मंदिर श्री विष्णुला समर्पित आहे. ह्या मंदिराचे वैशिष्ठ्य म्हणजे संपूर्ण भारतात श्री विष्णुला भगवंत या नावाने ओळखले हे एकमेव मंदिर आहे. हे मंदिर ई स १२४५ मध्ये हेमाडपंथी कला शैलीत बांधले गेले. मंदिराला चार दिशांनी चार प्रवेश द्वार आहेत पण मुख्य प्रवेश द्वार हे पूर्वाभिमुख आहे. गर्भ गृहा समोर गरुड खांब आहे. श्री भगवंताची मूर्ती काळ्या पाषाणाची असून भगवंताच्या हातात शंख, चक्र व गदा आहेत. राजा अंबरीश ची मूर्ती भगवंताच्या उजव्या हातास आहे. श्री लक्ष्मी भगवंताच्या पाठीमागे आहे. भगवंताच्या कपाळा वर शिवलिंग असून छातीवर भृगू रीशीच्या पायाचे ठसे आहेत.

मंदिराला श्री नानासाहेब पेशवे यांच्याकडून १७६० साली, इस्ट इंडिया कंपनी यांच्याकडून १८२३ साली व ब्रिटीश सरकारकडून १७८४ मध्ये इनाम मिळाल्याचे ईतिहास नोंदी आहेत. मंदिराची देख भाल पंच कमिटी मार्फत केली जाते. मंदिराच्या नित्य सेवा बडव्याकडून केली जाते. नित्य सेवांमध्ये सकाळी काकडा आरती, नित्य पूजा, महापूजा, संध्याकाळी धुपारती व रात्री शेजारती संपन्न होते. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघी एकादशी च्या पंढरपूरच्या यात्रा महोत्सवा दरम्यान मोठ्या संख्येने भक्त गण भगवंताचे दर्शन घेतात. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वेळेस भगवंताची गरुडावर बसून नगर प्रदक्षिणा केली जाते. प्रत्येक पौर्णिमाला छबिना काढला जातो.

  • श्री भगवंत बार्शी
  • श्री भगवंत मुर्ती
  • भगवंत मुर्ती
  • श्री भगवंत मुर्ती

कसे पोहोचाल?:

विमानाने

जवळचे विमानतळ - पुणे.

रेल्वेने

मध्य रेल्वेच्या कुर्डुवाडी-लातुर मार्गावर आहे.

रस्त्याने

सोलापूरपासुनचे अंतर 72 की.मी.