बंद करा

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी)

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) हे १९७६ साली केंद्र सरकार स्थापित अति महत्वाची विज्ञान व तंत्रज्ञान वर आधारित संस्था आहे. चांगल्या व पारदर्शक प्रशासन पद्धती अवलंबुन प्रशासनामध्ये ई -प्रशासानाचा अवलंब करणे व नागरिकांना एकात्मिक सेवा पुरविणे हा मुख्य उद्देश आहे. सध्या राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रोनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाशी संलग्न आहे. राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) सोलापूर ह्या कार्यालयाची स्थापना १९८८ मध्ये झाली. सुरुवातीला हे कार्यालय दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत होते. नंतर १९९४ साली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीत स्थलांतरीत झाले. तेव्हा पासून राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) सोलापूर चे कार्यालय कार्यरत आहे.

जिल्हा प्रशासनाला उपयोगी अशी विडीयो कॉन्फेरेन्सिंग सेवा जानेवारी २००४ पासून एन आय सी मध्ये सुरु आहे. ई-प्रशासन अंतर्गत ( एन आय सी) सोलापूर येथे केंद्र शासन व राज्य सरकार यांनी सुचविलेले विज्ञान व तंत्रज्ञान वर आधारित अनेक प्रकल्प  राबविण्यात येत आहेत. एन आय सी ने घेतलेल्या पुढाकारामुळे व विभागाच्या सहकार्यामुळे अनेक प्रकल्पात सोलापूर जिल्ह्याला प्रकल्प चाचणीसाठी निवडण्यात आले आहे.

राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) सोलापूर मध्ये खालील प्रकल्प यशस्वी पणे राबविण्यात आले आहेत.

 • जिल्हा परिषद सोलापूर येथे सुसज्ज संगणक कक्षाची स्थापना व ईतर विभागाशी जोडणी
 • जिल्हा न्यायालय सोलापूर येथे सुसज्ज संगणक कक्षाची स्थापना व ईतर विभागाशी जोडणी
 • जिल्हा उद्योग केंद्र सोलापूर येथे संगणक कक्षाची स्थापना
 • सरकारी व निम सरकारी कर्मचारी यांना संगणक प्रशिक्षण
 • सरकारी व निम सरकारी कर्मचारी यांना त्यांच्या संगणकीय प्रकल्पासाठी लागणारे प्रशिक्षण
 • जिल्ह्यातील तहसील कार्यालय, बी डी ओ कार्यालय व उप जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात संगणक कक्षाची स्थापना
 • जिल्ह्यातील उप विभागीय कार्यालयात संगणक कक्षाची स्थापना
 • जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व जिल्हा न्यायालय येथे लँन जोडणी लँन
 • वेळोवेळी एन आय सी – दिल्ली व एन आय सी मुंबई येथून प्राप्त सुचानाचे पालन करून संगणकीय प्रकल्प राबविणे

ईतर शासकीय कार्यालय व निम शासकीय कार्यालयांना तांत्रिक मदत

वरील कार्यालय व्यतिरिक्त खाली नमूद केलेल्या ईतर शासकीय कार्यालय व निम शासकीय कार्यालयांना तांत्रिक मदत जिल्हाधिकारी कार्यालय, उप विभागीय अधिकारी व तहसील कार्यालय

 • जिल्हा परिषद
 • जिल्हा न्यायालय
 • नँशनल सँपल सर्वे ऑर्गनायझेशन नँशनल सँपल
 • केंद्रीय जल आयोग
 • जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा
 • जवाहर नवोदय विद्यालय, पोखरापूर, तालुका मोहोळ
 • जिल्हा कोषागार
 • केंद्रीय उत्पादन शुल्क

सोलापूर येथे एन आय सी सोलापूर येथे खालील तांत्रिक हार्डवेअर उपलब्ध आहे. विंडो सर्वर, विंडो क्लायेण्टस, मल्टी फंक्शन डिव्हाईस , २४ x ७ युपीएस, २४ x ७ विडीयो कॉन्फेरेन्सिंग, १०० एमबीपीएस व ३४ एमबीपीएस लीस लाईन वर २४ x ७ नेटवर्क सपोर्ट, २०० संगणकीय लँन जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व शाखा व विभागांना ऑनलाईन जोडणी. राज्य सूचना विज्ञान अधिकारी, महाराष्ट्र राज्य व एन आय सी मुख्यालय नवी दिल्ली यांनी वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार एन आय सी सोलापूरचे कामकाज चालते.

जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (डीआयओ) व अतिरिक्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी ह्या दोन अधिकाऱ्या मार्फत एन आय सी सोलापूरचे कामकाज चालते. श्री मोहन कुमार बशिराबादकर, शास्त्रज्ञ – ई / जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (डीआयओ)/ तांत्रिक निर्देशक, एन आय सी सोलापूर आणी श्री उत्कर्ष होनकळसे , शास्त्रज्ञ – ई  / अतिरिक्त जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (एडीआयओ) / तांत्रिक निर्देशक , एन आय सी सोलापूर

संपर्क पत्ता – जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी (डीआयओ) राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र (एन आय सी ) पहिला मजला, महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, सात रस्ता, सोलापूर – ४१३००३ ( महाराष्ट्र) दूरध्वनी (०२१७) २७२२७८२ इमेल – mahsho[at]nic[dot]inसंकेतस्थळ – https://solapur.gov.in

संकेत स्थळ – https://www.nic.in

ट्वीटर – https://twitter.com/NICMeity

फेसबूक – https://www.facebook.com/NICIndia

इनस्टाग्राम – https://www.instagram.com/nicmeity/

यूट्यूब चॅनल – https://www.youtube.com/nationalinformaticscentre

लिंक्डइन – https://www.linkedin.com/company/national-informatics-centre/